बारामती, १२ ऑक्टोबर २०२०: बारामती शहरातील आप्पासाहेब पवार मार्ग लागत असणाऱ्या बारक्या पुलाच्या जवळ पाण्यात तोल जाऊन पडलेल्या दोन तरुणांना पोलिसानी गांभीर्य ओळखून स्थानिक तरुणांच्या मदतीने जवळपास एक तासानंतर बाहेर काढून त्या तरुणांचे प्राण वाचवण्यात यश आले.
बारामती शहरात सततच्या कोसळणाऱ्या पावसाने व नाझरे धारणातूम सोडलेल्या पाण्यामुळे कऱ्हा नदीला पूर आला आहे. आज दुपारी एकच्या सुमारास कपडे धुण्यासाठी आलेल्या ऋतू हिम्मत भोसले व बंटी भोसले हे तरुण कपडे धुत असताना त्यांचा तोल जाऊन ते पुराच्या पाण्यात पडले. मागील वर्षी पुरात वाहून गेलेल्या बारक्या पुलाला पकडले मात्र हा पूल वाहून गेल्याने येथे असणाऱ्या सिमेंटच्या पाईप मध्ये कंबरेच्या खाली दोघे अडकून पडल्याने आणि वरून पाण्याच्या प्रचंड दबावाने त्या दोघांना पाण्यातुन बाहेर येता येत नव्हते व पाणी त्यांना आतमध्ये ओढत होते. परिस्थिचे गांभीर्य ओळखून पोलीस व स्थानीक तरुण मदतीला धावले. व जवळपास अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने बंटी भोसलेला बाहेर काढण्यात यश आले. तर ऋतू मात्र पाण्यातील झुडपात अडकवून बसला होता. व मदतीची याचना करत होता. पोलिसानी तेथे असणाऱ्या साडीच्या मदतीने किशोर लोखंडे याने सावधपणे ऋतूला बांधत विरुद्ध दिशेला ओढले याचवेळी पोलिसानी या तरुणाला वरती ओढून त्याचे प्राण वाचवले.
घडलेला प्रकार लक्षात आल्यावर सहाय्यक पोलीस अधिकारी पद्मराज गंपले, सहाय्यक पोलीस अधिकारी योगेश शेलार, पोपट नाळे, राजभाऊ गायकवाड, तुषार चव्हाण, बापू इंगुले, होमगार्ड पी.खांमगळ, बारामती नगर परिषदेचे अधिकारी संजय प्रभुणे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत जाधव, किशोर लोखंडे या तरुणांनी अथक प्रयत्नांनी दोघांचे प्राण वाचवले त्यामुळे त्यांचे शहरात सर्वत्र कौतुक होते आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव