पुरंदर, दि. १३ जुलै २०२०: ग्रामीण भागातही लॉकडाऊन होणार या भीती पोटी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नीरा बाजारपेठेत आज (दि.१३) लोकांनी मोठी गर्दी केली होती. मोठी गर्दी झाल्याने पोलीस प्रशासनाने तातडीने गर्दी पंगवण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांना लॉकडाऊन बाबत संधिग्दता असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होतच होती. पोलिसांची लोकांना समजावण्यात व गर्दी पांगवण्यात मोठी दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले.
पुणे जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्ववभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा लॉकडाऊन करण्या संदर्भात सूचना दिल्यानंतर प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागातही लॉकडाऊन होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट केले नाही. पिंपरी चिंचवड पुणेशहर व हवेली तालुक्याचा काही भाग याबाबत काल निर्णय घेण्यात आला.
मात्र जिल्ह्यातील जास्त रुग्ण संख्या असलेल्या ग्रामीण भागाबाबत कोणतीच स्पष्ट भूमिका घेतली नाही. पुरंदर मध्ये कोरोना रुग्ण संख्या मोठी आहे. पुरंदर लॉकडाऊन असणार असल्याच्या अफवा पसरल्या जात होत्या. त्यामुळे लोक संभ्रमित होऊन खरेदी करू लागले आहेत. आज उशिरा निर्णय घेतला तर करायचे काय? असे विचारले जात होते. याबाबत पुरंदरचे तहसीलदार यांचेकडे विचारणा केली असता त्यांनीही याबाबत मौन बाळगणे पसंद केले. मात्र याचा परिणाम नीरा शहरातील गर्दी वाढण्यात झाला आहे.
लोकांनी पुढील १५ दिवस पुरेल एवढा किराणा भरण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी झालेली गर्दी पाहून पोलिसांनी बाजारपेठेतील ही गर्दी पांगविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र किराणा खरेदी करावयाचे असल्याने लोकांची गर्दी वाढत होती. ही गर्दी होऊ नये म्हणून पोलीस सूचना देत होते मात्र त्याचा काही परिणाम झाल्याचे दिसले नाही. पुरंदर तालुक्यातील सासवड जेजुरी या मुख्य बाजारपेठ कंटेनमेंट झोन असल्याने येथील दुकाने बंद आहेत. त्याचबरोबर शेजारील लोणंद ही बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावातील लोकांनी किराणा खरेदीसाठी नीरा बाजारपेठेमध्ये गर्दी केली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे