माणिक पवार यांना पोलीस महासंचालक पदक प्रदान

हडपसर, दि.३०एप्रिल २०२० : महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यामध्ये १५ वर्षे सेवा अभिलेख उत्तम ठेवल्याबद्दल पोलीस महासंचालक पदक (बोधचिन्ह) हडपसर पोलीस स्टेशनमधील सहायक पोलीस उपनिरीक्षक माणिक बाळासाहेब पवार यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

पवार यांना पोलीस महासंचालक पदक मिळाले , त्याबद्दल अनेक सामाजिक संस्था संघटनांकडून अभिनंदन करण्यात आले.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त पोलीस महासंचालकांकडून सेवा अभिलेख उत्तम ठेवून उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दरवर्षी पोलीस महासंचालकांकडून पदक देऊन सन्मानित करण्यात येते.
मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे १ मे रोजीचे कार्यक्रम रद्द केले आहेत. ज्यांना पदके जाहिर केली आहेत त्यांचा लवकरच सन्मान करण्यात येणार आहे. दरम्यान वानवडी पोलीस स्टेशनमधील सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब करचे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी-ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा