पोलिसांनी आईच्या अंतिम दर्शनासाठी जाण्यास रोखल

ठाणे: देशात लोक डाउन जही झाल्यापासून संचार बंदी करण्यात आली आहे. अश्या परिस्थितीत नागरिकांना भरही पडण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. जीवन आवश्यक गराजां व्यातरिक्त नागरिकांनी घरा बाहेर पडू नये असे सांगण्यात आले आहे आणि पोलिस देखील याची खबरदारी घेत बाहेर पडणाऱ्या ना चोप देत आहे. परंतु पोलिसांच्या या कठोर कारवाईतून एक धक्का दायक प्रकार समोर आला आहे. आपल्या आईच्या अंत्य संस्कारात एका मुलाला जातं आले नाही.

ठाणे येथील फर्निचर व्यापारी असलेला भैरवलाल लोहार याला त्याच्या आईच्या अंत्य संस्कार जाता आले नाही. २५ मार्च रोजी त्याची आईचे निधन झाले होते. त्याची आई राजस्थान मध्ये होती त्यामुळे त्याला राजस्थानला जने आवश्यक होते. भैरव लाल आपल्या आईच्या अंतिम दर्शनासाठी राजस्थानला निघाले असता त्याला गुजरात पोलिसांनी अडवले. ठाणे झालेला प्रकार पोलिसांना सांगितला परंतु पोलिसांनी त्याला तेथेच रोखून ठेवले. त्याने पोलिसांना वारंवार विनंती केली परंतु पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचे त्यांनी दावा केला आहे.

राजस्थान मधील राजसमन गावातील त्याची आई आहे. राजस्थान ला जाण्यासाठी त्याने ठाणे पोलिसांकडून परवानगी घेतली होती. ही लेखी परवानगी घेऊन तो गुजरातला निघाला होता. गुजरातच्या बॉर्डरवर पोहोचल्यावर त्याला पोलिसांनी अडवले. त्याने झालेला प्रकार पोलिसांना स्पष्ट केला, परंतु पोलिसांनी काहीही ऐकून घेतले नाही. त्याने ठाणे पोलिसांची परवानगी सुद्धा दाखवली तसेच आपल्या आईच्या मृतदेहाचे फोटो देखील दाखवले पण पोलिसांनी त्याला जुमान न देता पुढे सोडले नाही.

पोलिसांनी डेथ सर्टिफिकेट ची कॉपी फाडून टाकली त्याने व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून पोलिसांना आपल्या आईचे मृत पार्थिव दाखवण्याचा देखील प्रयत्न केला परंतु पोलिसांनी तो मोबाईल झटकत त्यांना तेथेच थांबून ठेवले. त्यामुळे आता पोलीस जे कठोर कारवाई करत आहेत ती करण्याआधी त्यांनी त्या गोष्टीची शहानिशा करून घेणे नक्कीच गरजेचे आहे. प्रत्येक नागरिक नियमांचे उल्लंघन करण्यासाठीच बाहेर पडतो असे नाही.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा