नांदेड: पोलिसांच्या झालेल्या चकमकीत नांदेड मधील गुंड शेरा फार झाला आहे. शहर व जिल्ह्यात त्याने दहशत पसरली होती. सोमवारी सायंकाळी साडेचार च्या सुमारास पोलीस आणि गुंडा यांच्यात चकमक झाली. यावेळी शेरा ने पोलिसांवर तीन गोळ्या झाडल्या. कुख्यात गुंड रिंदा याचे आम्ही हस्तक आहोत असे सांगून पिस्तुलचा धाक दाखवून जबरी चोरी करणारा शेरसिंग उर्फ शेरा दलबीर सिंग खैरा याने रविवारी रात्री शहरातील श्रीनगर व नमस्कार चौकात दोन दुकानात लूट केली होती.














































