अमेरिकन निवडणुकात तापले राजकीय रिंगण….

6

वॉशिंग्टन, १९ ऑगस्ट २०२०: सध्या अमेरिकेत कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात असले तरी तिथे निवडणुका मात्र जवळ येत असल्याने राजकीय वातवरण हे चांगलेच तापताना दिसत आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या दोन्ही देवेदार उमेदवारांनी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी आश्वासनांची पट्टी द्यायला सुरवात केली आहे.

या राजकीय मैदानात नुकतेच डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार बिडेन यांनी एक आश्वासन दिले आहे ज्यामध्ये ते म्हणाले की सत्ता आली तर एच-१ बी व्हिसा प्रणालीत सुधारणा करून ग्रीनकार्ड कोटा पद्धती रद्द करण्यात येईल. भारतीय स्वातंत्र्यानिमित्त झालेल्या एका शुभेच्छा सोहळ्यात अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी बिडेन यांनी हे आश्‍वासन दिले आहे.

काय आहे एच १ बी व्हिसा….

एच-१ बी व्हिसा हा अस्थलांतरित पद्धतीचा असून त्याच्या मदतीने अमेरिकन कंपन्या परदेशी कामगारांना नोकरी देतात.येथील संगणक तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुतेक सर्व कंपन्या त्या व्हिसाद्वारे परदेशातील कर्मचारी वर्गाला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण देतात व मोठ्या पगाराच्या नोकऱ्या देतात. जगभरातील अन्य देशांपेक्षा भारत व चीन या देशातूनच सर्वाधिक कुशल कर्मचारी त्यांना मिळतात.

अमेरिकेत भारतीय मतदार मोठ्या प्रमाणात…..

अमेरिकेत भारतीय मतदार देखील मोठ्या प्रमाणात आहेत. या आधी होणा-या निवडणुकीत या मतदारांकडे विशेष लक्ष दिले जात नसे. पण, आलीकडील काळात भारत अमेरिकेचे संबध बघता अमेरिकेतील भारतीय मतदारांना देखील गृहीत धरले जात आहे. तर अमेरिकेतील भारतीयांसाठी निवेदन जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ असून देशातील ८ राज्यात १३ लाख भारतीय मतदार आहेत. त्यामुळे त्यांना प्रलोभन देण्याच्या बिडेन यांच्या कृतीची चर्चा होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा