चक्क राजकारण्यांकडे स्वतःच्या गाड्या नाहीत..!

मुंबई, दि. १२ मे २०२०: राजकारण्यांना स्वतःचे वाहन बाळगण्याची गरज का लागत नाही? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज भरला आणि त्यांच्या संपत्तीची चर्चा सुरू झाली. कुटुंबाची एकूण संपत्ती आहे १८४ कोटी रुपयांची पण; आश्चर्य म्हणजे ठाकरे यांच्याकडे स्वतःच्या मालकीचं वाहन नाही. एवढेच नव्हे तर अनेक बड्या राजकारण्यांकडे स्वतःचे वाहन नसल्याची बाब समोर आली आहे.

सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शशिकांत शिंदे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याकडेही करोडोंची संपत्ती आहे पण नावावर एकही गाडी नाही. काँग्रेसचे बडे नेते राहुल गांधींनीही लोकसभा निवडणुकीच्यावेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःचं वाहन नसल्याची बाब नमूद केली. इतकेच काय तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही स्वतःचे वाहन नाही.

राजकारण्यांच्या दिमतीला सरकारी गाड्या असतात शिवाय यापैकी अनेकांना झेड प्लस किंवा एस पी जी ची सुरक्षाही असते अशावेळी स्वतःचं वाहन बाळगण्याची फारशी गरजही नसते. त्यामुळे कदाचित स्वतःच्या मालकीचं वाहन नसण्याचं हेच कारण असावं.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा