पुणे, २८ नोव्हेंबर २०२२ : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. अहमदगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदुरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वर्धा, ठाणे, वाशीम, यवतमाळ, नांदेड, नाशिक या जिल्ह्यांतील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. १८ डिसेंबरला मतदान होणार असून, २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहेत. ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत रस घेतला आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच सरपंच आणि सदस्यपदासाठी कोणते उमेदवार सरस ठरू शकतात, याची चाचपणी करण्यास सुरवात केली आहे. ग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी स्थानिक स्तरावर पॅनल तयार करून या निवडणुका राजकीय पक्षांच्या नेतृत्वात लढविल्या जातात. त्यातच सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकारण तापले असून, गावातील चावडीवर आता निवडणुकीच्या चर्चा झडत असल्याचे चित्र सध्या सर्वच गावांमध्ये दिसत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ता. ७ नोव्हेंबर २०२२ रोजी एक परिपत्रक काढून ग्रामपंचायत निवडणूक कशापद्धतीने घ्यावी, त्याची आचारसंहिता प्रत्येक जिल्ह्याला पाठविली आहे. यामध्ये मतदार याद्या, निवडणुकीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आदींबाबत सूचना दिल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून स्वतंत्ररीत्या निवडणूक कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
अशी असेल आचारसंहिता प्रक्रिया
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत, त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू राहणार आहे; तसेच ज्या तालुक्यांत पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत, त्या संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू असणार आहे. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींच्या सीमेलगतच्या गावांमध्येसुद्धा आचारसंहिता लागू राहील, असा आदेश काढण्यात आला आहे.
विविध जिल्ह्यांतील तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे :
अहमदनगर : अकोले ११, जामखेड ३, कर्जत ८, कोपरगाव २६, नगर २७, नेवासा, १३, पारनेर १६, पाथर्डी ११, राहाता १२, संगमनेगर ३७, शेवगाव १२, श्रीरामपूर ६, राहुरी ११, श्रीगोंदा १०
अकोला : अकोला ५४, अकोट ३७, बाळापूर २६, बार्शी टाकळी ४७, मूर्तिजापूर ५१, पातूर २८, तेल्हारा २३
अमरावती : अचलपूर २३, अमरावती १२, अंजनगाव सुर्जी १३, भातकुली ११, चांदुर बाझार २७, चांदूर रेल्वेस्टेशन १७, चिखलदरा २६, दर्यापूर २५, धामणगाव रेल्वेस्टेशन ७, धारणी २३, मोर्शी २४, नांदगाव खा. १७, तिवसा १२, वरुड २३
औरंगाबाद : गंगापूर ३५, खुलताबाद १०, पैठण २२, फुलंब्री १८, सिल्लोड १८, वैजापूर २५, औरंगाबाद २५, कन्नड ५१, सोयगाव ५,
बीड : अंबाजोगाई ८३, आष्टी १०९, बीड १३२, धारूर ३१, गेवराई ७६, केज ६६, माजलगाव ४४, परळी ८०, पाटोदा ३४, शिरूर कासार २४, वाडवणी २५
भंडारा : भंडारा ३९, लाखांदूर ५१, लाखाणी ५१, मोहाडी ५८, पाओनी ४६, साकोली ४१, तुमसर ७७,
बुलडाणा : बुलडाणा १२, चिखली २८, देऊळगावराजा १९, जळगाव जामोद १९, खामगाव १६, लोणार ३९, मलकापूर ११, मेहेकर ५०, मोताळा ११, नांदुरा १३, संग्रामपूर २१, शेगाव १०, सिंदखेडराजा ३०
चंद्रपूर : बल्लारपूर ५, भद्रावती ७,ब्रह्मपुरी १, चंद्रपूर ५, चिमूर ४, जिवती ३, कोरपणा १०, मुळ ७, नागभिड ५, पोंभुर्णा २, राजुरा ४, साओली ३, सिंदेवाही २, वरोरा १,
धुळे : धुळे ३३, शिरपूर १७, शिंदखेडा २३, साक्री ५५
गडचिरोली : अहेरी ३, अरमोरी २, चामोर्शी ४ ,देसाईगंज १, धानोरा ४, एटापल्ली १, कोर्ची १, गडचिरोली २, कुरखेडा २, सिरोंचा ७
गोंदिया : आमगाव ३४, अर्जुनी मोरगाव ४०, देवरी २५, गोंदिया ७१, गोरेगाव ३०, सडक अर्जुनी ४३, सालेकसा ३१,
हिंगोली : औंढा नागनाथ ७, वसमत १३, हिंगोली १६, कळमनुरी १६, सेनगाव १०
जळगाव : अमळनेर २४, भडगाव ६, भुसावळ ६, बोदवड ५, चाळीसगाव १६, चोपडा ५, धरणगाव ७, एरंडोल ६, जळगाव १२, जामनेर १२, मुक्ताईनगर २, पारोळा ९, रावेर २२, यावल ८
जालना : अंबड ४०, घनसावंगी ३४, जाफ्राबाद ५५, जालना २९, परतूर ४१, भोकरदन ३२, मंठा ३५
कोल्हापूर : आजरा ३६, भुदरगड ४४, चांदगड ४०, गडहिंग्लज ३४, गगनबावडा २१, हातकणंगले ३९, कागल २६, करवीर ५३, पन्हाळा ५०, राधानगरी ६६, शाहुवाडी ४९, शिरोळ १७
लातूर : अहमदपूर ४२, औसा ६०, चाकुर ४६, जळकोट १३, लातूर ४४, निलंगा ६८, शिरूर अनंतपाळ ११, उदगीर २६, देवणी ८, रेनापूर ३३
नागपूर : भिवपूर १०, कळमेश्वर २३, कम्पटे २७, काटोल २७, कुही ४, मोऊदा २४, नागपूर ग्रामीण १९, नरखेड २२, पारशिवणी २२, रामटेक ८, सावणेर ३६, उमरेड ७, हिंगणा ७, मौऊदा १
नंदुरबार : अक्कलकुवा ३१, अक्राणी ४७, नंदुरबार १८, नवापूर १६, शहादा १०, तळोदा १
उस्मानाबाद : भूम २, कळंब ३०, लोहारा १३, उस्मानाबाद ४५, परांडा १, तुळजापूर ४८, उमरगा २३, वाशी ४
पालघर : पालघर ३२, तलासरी १, वसई १५, वाडा १५,
परभणी : गंगाखेड १३, जिंतूर ३३, मानवत ८, पालम ११,परभणी २९, पाथरी ७, पूर्णा १३, सेलू ११, सोनपेठ ३,
पुणे : आंबेगाव २१, बारामती १३, भोर ५४, दौंड ८, हवेली ७, इंदापूर २६, जुन्नर २, खेड २३, मावळ ९, मुळशी ११, शिरुर ४, वेल्हा २८,
रायगड : महाड ७३, श्रीवर्धन १३, अलिबाग ६, उरण १८, कर्जत ७, खालापूर १४, तळा १, पनवेल १०, पेण २६, पोलादपूर १६, माणगाव १९, मुरूड ५, म्हसळा १३, रोहा ५, सुधागड १४
रत्नागिरी : चिपळूण ३२, दापोली ३०, गुहागर २१, लांजा १९, मंडणगड १४, रत्नागिरी २९, संगमेश्वर ३६, खेड १०, राजापूर ३१
सांगली : आटपाडी २६, जत ८१, कडेगाव ४३, कवठे महाकाळ २९, खानापूर ४५, मिरज ३८, पलूस १६, शिराळा ६०, तासगाव २६, वाळवा ८८
सातारा : जावली १५, कराड ४४, खंडाळा २, खटाव १५, कोरेगाव ५१, महाबळेश्वरर ६, माण ३०, पाटण ८६, फलटण २४, सातारा ३९, वाई ७
सिंधुदुर्ग : देवगड ३८, दोडामार्ग २८, कणकवली ५८, कुडाळ ५४, मालवण ५५, सावंतवाडी ५२, वैभववाडी १७, वेगुर्ला २३
सोलापूर : अक्कलकोट २०, बार्शी २२, करमाळा ३०, माढा ८, माळशिरस ३५, मंगळवेढा १८, मोहोळ १०, उत्तर सोलापूर १२, पंढरपूर ११,सांगोला ६, दक्षिण सोलापूर १७
ठाणे : भिवंडी १४, कल्याण ९, मुरबाड १४, शहापूर ५
वर्धा : आर्वी २६, आष्टी ६, देवळी १२, हिंगणघाट १२, कारंजा १७, समुद्रपूर ७, सेलू २३, वर्धा १०
वाशीम : कारंजा ५७,मालेगाव ४८, मंगरूळपीर ४४, मानोरा ४१, रिसोड ४५, वाशीम : ५२
यवतमाळ : अर्णी ७, बाभुळगाव १, दारव्हा ८, दिग्रस ५, घाटंजी ६, मारेगाव९, नेर १, पुसद १२, राळेगाव , उमररखेड ४, वाणी १९, यवतमाळ १६, झारजिमणी ४
नांदेड : अर्धापूर २, उमरी १, कंधार १६, किनवट ५३, देगलूर १, धर्माबाद ३, नांदेड ७, नायगाव ८, बिलोली ९, भोकर ३, माहूर २७, मुखेड १५, मुदखेड १, लोहारा २८, हदगाव ६, हिमायतनगर १
नाशिक : इगतपुरी २, कळवण १६, चांदवड ३५, त्र्यंबकेश्वर १, दिंडोरी ६, देवळा १३, नांदगाव १५, नाशिक १४, निफाड २०, पेठ १, बागलाण ४१, येवला ७, सिन्नर १२
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील