पूजा हेगडे बर्थडे स्पेशल

पुणे, १३ ऑक्टोंबर २०२२: साउथ चित्रपटात मिळालेल्या यशानंतर पूजा हेगडे वळली ती बॉलिवूड कडे. तिने बॉलिूडमधे एन्ट्री केली ती २०१६ च्या मोहनजोदाड़ो चित्रपटातून. पहिल्याच सिनेमात पूजाला हृतिक रोशन सारख्या नामवंत कलाकारासोबत काम करण्यासाठी संधी मिळाली. हा चित्रपट जरी बॉक्सऑफिसवर कमाल दाखवू शकला नसेल तरी पूजा ला २०१९ मधे हाऊसफुल्ल ४ मधे अक्षय कुमार सोबत काम करायला मिळालं.

पूजा ला लहानपणा पासूनच मॉडेलिंग करायला आवडत होतं. २०१० मधे तिने मिस युनिव्हर्स इंडिया यात सहभाग घेतला होता आणि तिने दुसरा क्रमांक पटकावला. हीच आवड मनोरंजन क्षेत्रात पुढे जायला तिचं धाडस बनली. पूजाने तीच्या १० वर्षाच्या करिअर मधे साधारण १७ चित्रपटात काम केलंय. तमिळ, तेलगू, हिंदी अश्या विविध प्रकारच्या भाषेत तिने काम केलंय. तिचं अनेक भाषांवर उत्तम प्रभुत्व आहे.

प्रभास, राम चरण, ज्युनियर एनटीआर, महेश बाबू आणि अल्लू अर्जुनसह सर्व मोठ्या स्टार्ससोबत काम करण्याचे श्रेय तिला आहे आणि तिचे सर्वच सिनेमे हिट ठरले आहेत.
पूजा हेगडे चे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. तीच्या व्यवसायिक आणि वैयक्तीक आयुष्याचे उपडेट्स ती चाहत्यांसाठी कायमच देत असते. अशा ह्या सुंदर अभिनेत्रीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

न्यूज अनकट प्रतिनिधी : केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा