पूजाच्या आईवडिलांनी मुख्यमंत्र्यांना दिले भावनिक पत्र…

मुंबई, १ मार्च २०२१: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर  राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आपला राजीनामा उद्धव ठाकरेंना सुपूर्द केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. यानंतर या प्रकरणावर पहिल्यांदाच मुख्य मंत्र्यांनी वक्त्याव केले.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत यासर्व प्रकरणावरील मौन सोडले.
दरम्यान पुजा च्या आई- वडिलांनी मुख्य मंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिला. त्या नंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. यापूर्वीच हे पात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले होते. हे पत्र परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेदरम्यान वाचून दाखवले.
पूजाच्या आईवडिलांचे मुख्यमंत्र्यांना दिलेले भावनिक पत्र
सन्माननीय मुख्यमंत्री महोदय,
आमची मुलगी कु. पूजा चव्हाण हिचा दिनांक ७ फेब्रुवारी रोजी दुर्देवी मृत्यू झाला आहे. कुठल्याही माता-पित्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असतो, आमची ही वेदना आता कधीही भरुन येणार नाही. मुलीच्या अकाली मृत्यूच्या दु:खापेक्षा अधिक त्रासदायक आणि आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीचा मृत्यू संदर्भात जी चर्चा होत आहे. तिच्यावर खूप गलिच्छ आरोप लावून संजय राठोड यांचे नाव घेऊन उलटसुलट बातम्या येत आहेत. जे निराधार आहेत.
आपण यासंबंधी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या घटनेचा तपास वेगाने व्हावा. जे दोषी असतील, त्यांच्यावर आपण निश्चितच कारवाई कराल याची खात्री आहे.
आमच्या मुलीचा बळी गेला, पण फक्त संशयावरुन कोणाचाही बळी जाऊ नये. संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केली नाही. आमची मुलगी गमावली परंतू या आड राजकारण करुन दररोज होणाऱ्या आरोपाने तिचा रोज बळी जातोय. याचे राजकारण करुन संजय राठोड यांना आरोपी ठरवून राजीनामा घेऊ नये.
तपासामध्ये राठोड किंवा अन्य कोणीही दोषी असल्यास कठोर कारवाई करुन न्याय द्यावा. परंतू संशयावरुन मुलीवर किंवा कोणावरही आरोप करु नये. संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत. ते खूप कष्ट करुन येथपर्यंत पोहोचले आहे. फक्त संशयावरुन त्याचा बळी घेऊ नये. तपास पूर्ण झाल्यावर दोषींवर कारवाई करावी. राजकारणामुळे आणि दबावाने घाईत निर्णय घेऊ नये. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आपण आम्हाला न्याय द्याल.
आपले नम्र,
लहू चंदू चव्हाण (पूजाचे वडील)
मंदोधरी लहू चव्हाण (पूजाची आई)
दिव्याणी लहू चव्हाण (पूजाची बहीण)
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा