तिसऱ्या टी-20 मालिकेत अखेर पाहून्यांनी मिळवला भारतावर २६ धावांनी विजय

67

२९ जानेवारी २०२५ राजकोट : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसऱ्या टी-20 क्रिकेटचा सामना राजकोट येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात इंग्लंड संघाने टीम इंडियावर २६ धावांनी विजय मिळवत आपले खाते उघडले असून टी-20 मालिकेत जीवित राहण्याचे स्थान निश्चित केले आहे. प्रथम फलंदाजी करत असताना इंग्लंड संघाने २० षटकांत ९ गाडी गमावून १७१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अपयशी ठरला आहे. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-2 अशी स्थिती निर्माण केली आहे, त्यामुळे आगामी ३१ तारखेला पुण्यात होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

अशी राहिली भारताची खेळी:

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना वरुण चक्रवर्तीने शानदार कामगिरी केली. त्याने 24 धावा देत 5 विकेट्स घेतेल्या. त्याचबरोबर फलंदाजीत टीम इंडियाची गाडी डगमगली भारतीय संघाकडून संजू सॅमसन (3), सूर्यकुमार यादव (14), आणि तिलक वर्मा (18) झटपट बाद झाले. अभिषेक शर्माने 24 धावांचे योगदान दिले, तर हार्दिक पांड्या (40) आणि अक्षर पटेल यांच्या भागीदारीमुळे भारताला काही प्रमाणात सावरता आले. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने २ विकेट्स, रवी बिष्णोई आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतल्या.

इंग्लंडची विजयी खेळी:

इंग्लंडकडून डकेटने 28 चेंडूत शानदार अर्धशतक झळकावत संघाला भक्कम आधार दिला. त्याने सात चौकार आणि दोन षटकार ठोकत 51 धावा केल्या.जोस बटलर (24) आणि हॅरी ब्रुक (8) लवकर बाद झाले, पण त्यांच्या गोलंदाजांनी सामना फिरवला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर