नवी दिल्ली: तांदळापासून इथेनॉल तयार करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली. या इथेनॉलचा उपयोग सॅनिटायझर बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात इथेनॉलची मोठी मागणी आहे. यासाठी एफसीआयच्या गोदामात पडलेले अतिरिक्त तांदूळ वापरला जाईल. केंद्राने याला मान्यता दिली आहे.
हा निर्णय श्रीमंतांच्या बाजूने असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे, ते म्हणाले की, भारताच्या गरिबांनी केंद्राच्या या निर्णयाला विरोध करायला हवा. कॉंग्रेसने म्हटले आहे की सरकारने दारू कंपन्यांना इथेनॉल तयार करण्यास सांगावे जेणेकरुन सेनिटायझर्स होऊ शकतात. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी सांगितले की, गरीब लोक उपासमारीने मरत आहेत आणि देशातील सरकारला गरिबांच्या हक्काच्या तांदळाचे सेनिटायझर बनवायचे आहे.
आपल्या ट्विटमध्ये राहुल म्हणाले, “केव्हा भारतातील गरीब जागे होतील, जेव्हा तुम्ही उपासमारीने मरत आहात त्यावेळेस तुमच्या हक्काच्या तांदळाचे ते श्रीमंतांसाठी सेनेटिझेर बनवणार आहेत.”
नंतर कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले की, सरकार या निर्णयामुळे देशातील गरीबांची थट्टा करीत आहे. ते म्हणाले, “आपण पाहिले आहे की परप्रांत कामगार आपल्या घरी जाण्यासाठी अनेक मैल चालत आहेत, त्यांच्याकडे अन्नाची कमतरता आहे, अन्नधान कायद्यांतर्गत प्रत्येकाला भोजन देण्याचे आवाहन कॉंग्रेसने सरकारला केले आहे. पण सरकार चा हा निर्णय एक विनोद आहे. “