गोल पोस्ट स्पॉटलाइट संगीत लोकप्रिय संगीतकार जी.व्ही. प्रकाश यांनी जाहीर केले की

लोकप्रिय संगीतकार जी.व्ही. प्रकाश यांनी जाहीर केले की

तामिळनाडू, ८ ऑगस्ट २०२० : काल दिनांक ७ ऑगस्ट,२०२० रोजी ,लोकप्रिय संगीतकार जी. व्ही. प्रकाश यांनी आपल्या चाहत्यांचे आभार मानले. त्यांचे सुरुराई पोत्रू मधील सिंगल ट्रॅक कट्टू पयले या ट्रॅक यूट्यूब वर “टॉप १०० गाण्यांमध्ये” मजल मारली आहे. तसेच त्यांना चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांचे चाहते त्यांना ट्विटर वर ट्विट करून शुभेच्छा देत आहेत.

तसेच जी. व्हीं. प्रकाश यांनी सुद्धा ट्विटर वर ट्विट करत आपल्या चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छा बद्दल आभार मानले आहे. तसेच या चित्रपट निर्मिती टीम ने याच गाण्याचं लिरिकल व्हर्जन सुद्धा युट्यूब वर प्रदर्शित केले आहे. तसेच या गाण्याचे लिरिक्स तमिळ बिग बॉस १ फेम स्नेहन ने दिले आहे. तसेच हे गाणं रावडी बेबी फेम धी ने गायले आहे.

तसेच सुराराई पोत्रु हा चित्रपट उन्हाळ्यात २०२० मध्ये मोठ्या पडद्यावर येणार होता परंतु जागतिक कोरोना महामारिमुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. तसेच हा चित्रपट तेलुगू मध्ये सुद्धा “आकसंम नी हद्दू रा” या नावाने प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाचे निर्माते सुधा के प्रसाद आहेत. तसेच सह निर्माते सुरिया आणि गुनित मोंगे आहेंत. येत्या काही दिवसात चित्रपट प्रदर्शनाची अंतिम तारीख निश्चित होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version