काही वर्षांपासून सरकारने जवळपास अनेक पॉर्न साईट्सवर बंदी घातली आहे. परंतु तरीही पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
आज देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. यात पॉर्न बघून केलेल्या अत्याचाराची अनेक उदाहरणेही समोर येत आहेत.
पॉर्नमुळे वैवाहिक संबंध बिघडण्याचे, जोडीदाराला धोका देण्याचे प्रमाण तब्बल २५० ते ३०० टक्यांनी वाढले असल्याचे काही सर्वेक्षणातून समोर आले आहे.
पॉर्न बघितल्याने तुमच्या पार्टनरसोबतच्या रिलेशनशिपमधील रस कमी होतो. याचे कारण असे की तुम्हाला पॉर्नमधून क्षणिक सुख मिळवण्याची सवय लागलेली असते.
“स्ट्राएटम” नावाचा भाग आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी प्रेरित करणाऱ्या मेंदूतल्या यंत्रणेचा महत्त्वाचा भाग आहे. पॉर्नच्या सवयीमुळे त्याचा आकार कमी होतो. त्यामुळे मेंदूतली ही यंत्रणा योग्य प्रकारे काम करत नसल्याचे समोर येत आहे.
याशिवाय तुम्हाला सतत पॉर्न पाहण्याची सवय जर लागलेली असेल तर सतत सेक्स करण्याची इच्छा देखील निर्माण होते, या गोष्टीसाठी एक तर पत्नीवर दबाव आणला जातो किंवा आपण सतत नवीन शिकार शोधण्याचा प्रयत्न होतो.त्यामुळे आपल्याकडून गंभीर गुन्हा घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
अनेकदा आपण कोणत्या प्रकारचे पॉर्न पाहता या सर्व गोष्टी चेक केल्या जातात. पॉर्न साइट सर्च केल्यानंतर काही ‘मालवेअर’ तुमची सिस्टिम लॉक करतात.
त्यामुळे तुम्ही सर्च केलेल्या पॉर्न साइटची माहिती त्यांना मिळते. त्याचा उपयोग ते खंडणी मागण्यासाठी अथवा अन्य कारणांसाठी करू शकतात.
त्यामुळे पॉर्न अश्लिल वेबसाइट किंवा अन्य ऑनलाइन डेटिंग साइट असो, त्यावरील तुमच्या प्रोफाइलचा तुमच्याविरोधात गैरवापर होऊ शकतो. यापूर्वी जेव्हा या साइटचा डेटा लीक झाला होता. तेव्हा अनेकांचे आयुष्य धोक्यात आले होते. त्यामुळे अशा गोष्टी करतांना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.