रत्नागिरीतील पोसरे इथंही दरड कोसळली, १७ ढिगाऱ्याखाली अडकले

3

चिपळून, २४ जुलै २०२१: महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. राज्यात अनेक ठिकाणी दरडी देखील कोसळल्या आहेत ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झालाय. महाडला दरड कोसळून ३८ लोक मृ्त्युमुखी पडल्यानंतर तेथे बचावकार्य सुरू असतानाच चिपळूनमध्ये पोसरे-बौद्धवाडीतही दरड कोसळली आहे. येथे १७ लोक दरडीखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही दुर्घटना घडताच बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. यामुळे दरड कोसळून झालेल्या मृत्यूंच्या संख्येत आणखीन वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कुठे किती मृत्यू?

चिपळूणमधील अपरांत हॉस्पिटल, कोव्हिड सेंटरमधील ८ रुग्णांचा मृत्यू
तळीये, महाड – ३८ मृतदेह हाती
आंबेघर, सातारा – १२ जणांचा मृत्यू
पोलादपूर, रायगड – ११ जणांचा मृत्यू
वाई, सातारा – २ महिलांचा मृत्यू

पोसरे, रत्नागिरी – १७ जणांचा मृत्यू

कणकवली – दिगवळे, सिंधुदुर्ग – १ महिलेचा मृत्यू

चिपळूनमध्ये मुसळधार पावसाने कहर केला असून येथील लोकांना महापुराचा सामना करावा लागत आहे. चिपळूनमधील पुरात अडकलेल्या तब्बल १ हजार ८०० लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. चिपळूनची परिस्थिती पाहता लष्कर आणि नौदलांची ४ पथके चिपळूनला पोहोचत असल्याची माहिती शासकीय अधिकाऱ्यांनी दिली. या बरोबरच चिपळूनमध्ये हवाईदलाचे ३ हेलिकॉप्टर बचावकार्य करत असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. चिपळूनमध्ये एनडीआरएफची ४ पथकेही बचावकार्य करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा