चीनमधील लसीचे सकारात्मक परिणाम….

चीन, १९ ऑक्टोबर २०२०: चीनमध्ये नवीन कोरोना विषाणूच्या लसीच्या प्रतिपिंडास अँटीबॉडीज वर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याबाबतचा अहवाल गुरुवारी ‘द लान्सेट इंफेक्शियस डिसीज जर्नल’मध्येही प्रसिद्ध करण्यात आला आहे. लसीचे हे परिणाम एका छोट्या प्रमाणावर घेण्यात आलेल्या क्लिनिकल ट्रायल च्या सुरुवातीचा भाग होता. जे सक्रीय करण्यात आलेल्या सार्स कोव्ह-२ वायरस वर आधारित होते.

या लसी उमेदवाराची चाचणी २९ एप्रिल ते ३० जुलै दरम्यान चीनमध्ये घेण्यात आली. या लसीच्या अभ्यासाला ‘बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स’ यासह अनेक मोठ्या संस्थांमधील संशोधक उपस्थित होते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, प्रारंभाच्या टप्प्यातील चाचणीत सहभागी झालेल्या सर्व ४२ स्वयंसेवकांमध्ये अँटीबॉडीसचा योग्य प्रतिसाद मिळाला आहे.

द लॅन्सेट इन्फेक्टीव्ह डिसिसीज या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात संशोधकांनी असा दावा केला आहे की ही लस केवळ प्रभावीच नाही तर संपूर्ण चाचणीच्या काळात कोणत्याही स्वयंसेवकात त्याचे कोणतेही दुष्परिणाम अद्याप दिसलेले नाहीत. या लसीच्या चाचणीत १८ वर्षांपासून ते ८० वर्षांपर्यंतच्या ६०० हून अधिक स्वयंसेवकांचा समावेश होता.

तज्ञांनी सांगितले की, चाचणीच्या प्रारंभिक टप्प्यातील उद्दीष्टेचा हेतू लसीची सुरक्षा आणि प्रतिकारशक्तीसंदर्भातील प्रतिसाद तपासणे आहे. कोविड -१९ पासून रुग्णाची सुरक्षा करण्यासाठी ही लस पुरेशी असली तरी अद्याप हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, क्लिनिकल चाचणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात सापडलेला हा डेटा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात खूप उपयुक्त सिद्ध होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा