औंध मधील एम्स रुग्णालयात सापडला पॉझिटिव्ह रुग्ण

पुणे-औंध, दि. २६ एप्रिल २०२०: पुण्यामध्ये औंध येथे एम्स हॉस्पिटलमध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण वयस्कर होता आणि त्यामध्ये लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली होती. याचबरोबर शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा आज एक हजाराच्या पार गेला. शनिवारी नव्याने आढळून आलेल्या ९० रूग्णांमुळे पुणे शहरातील (पुणे महापालिका हद्दीतील) कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ९० झाली आहे तर आज आणखी पाच जणांचा बळी कोरोनाने घेतला असून, शहरातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण मृत्यूची संख्या ६९ झाली आहे.

औंध मधे सापडलेला हा रुग्ण रविवार पेठ मधील असल्याचा सांगण्यात आले आहे. २० तारखेला हा रुग्ण एम्समध्ये दाखल करण्यात आला होता. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना या रुग्णांमध्ये कोरोना ची लक्षणे दिसली होती त्यानंतर त्याची टेस्ट घेण्यात आली.

काल रात्री (२५ एप्रिल) आकरा वाजता या रुग्णाला पिंपरी-चिंचवडमधील वाय सी एम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. या रुग्णाची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर एम्स हॉस्पिटलमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. आज सकाळी सर्व कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात येत होते. तेथील काही नागरिकांकडून हॉस्पिटल विषयी तक्रारही करण्यात आली. नागरिकांचे म्हणणे होते की हॉस्पिटलचे मॅनेजमेंट सदर घटनेविषयी सतर्कता बाळगत नाही. पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर ही सुरक्षितेच्या दृष्टीने कोणती ही पावले उचलली गेलेली नाहीत.

औंध मधील एम्स हॉस्पिटल ला लागूनच सरकारी कुटी रुग्णालय देखील आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने लवकरात लवकर पाऊले उचलणे गरजेचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा