नवी दिल्ली, ७ एप्रिल २०२१: पूर्व लडाखमधील भारत आणि चीनमधील सीमा विवाद सोडविण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्य-स्तरावरील ११ वी फेरी या आठवड्याच्या शेवटी घेण्यात येऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ९ एप्रिल रोजी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलविली जाऊ शकते.
गेल्या वर्षी एप्रिल ते मे दरम्यान भारत आणि चीनमधील सीमा विवाद सोडविण्यासाठी कॉर्प्स कमांडर लेव्हलच्या १० बैठका यापूर्वीही झालेल्या आहेत. आता लष्करी चर्चेची ११ वी फेरी शुक्रवारी (९ एप्रिल) होण्याची शक्यता आहे.
लष्करी चर्चेदरम्यान, दोन्ही देशांमधील चर्चेचे मुख्य उद्दीष्ट गोग्रा हाइट्स, सीएनसी जंक्शन आणि देपसांग मैदानी भागांबाबत सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यावर असेल. भारतीय बाजूने हे स्पष्ट केले गेले आहे की, माघार घेण्याबाबत केवळ तेव्हाच एकमत होऊ शकेल, जेव्हा एकाचवेळी दोन्ही सैन्य मागे हटेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे