नवी दिल्ली – केंद्र सरकारने पाेस्ट ऑफिस अल्पबचत याेजनेवर मिळणारे व्याजदर आॅक्टाेबर ते डिसेंबर तिमाहीसाठी जैसे थे ठेवले आहेत. यामध्ये काेणताही बदल केला नाही. अर्थ मंत्रालयाने सोमवारी परिपत्रक जारी करून ही माहिती दिली. अल्पबचत याेजनेअंतर्गत पाेस्ट ऑफिस, स्माॅल पाेस्ट ऑफिस एफडी, एनएससी, पीपीएफ, सुकन्या समृद्धी खाते, रेकरिंग डिपाॅझिट, ज्येष्ठ नागरिक याेजना आणि किसान विकास पत्रासारख्या याेजना येतात.
बँका आपल्या मुदत ठेवीच्या दरात कपात करत आहेत. अशा स्थितीत सरकार या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत याेजनेच्या व्याजदरातही ०.१०% ची कपात करू शकते. असे असले तरी विश्लेषकांना दर कपातीबाबत माेठी आशा नव्हती. कारण, लाेक या याेजनांबाबत अधिक संवेदनशील असतात. त्यांना सुकन्या समृद्धी आणि ज्येष्ठ नागरिक याेजनेवर अन्य अल्पबचत याेजनांकडून जास्त व्याज मिळण्याची आशा आहे. केंद्र सरकारच्या अल्पबचत याेजनांतून अधिक व्याज मिळण्याची आशा आहे. केंद्र सरकार अल्पबचत याेजनेच्या व्याजदरांचा १ एप्रिल २०१६ पासून तिमाही आधारावर आढावा घेऊ शकते. याआधी जुलै ते सप्टेंबर तिमाहीसाठी सरकारने पीपीएफ आणि अन्य लघुबचत याेजनेच्या व्याजदरात ०.१० टक्के कपात केली हाेती.
अल्पबचत याेजनांवरील व्याजदर
> पाेस्ट आॅफिस बचत खाते 4.00%
> एक वर्षाची मुदत ठेव 6.90%
> २ वर्षांची मुदत ठेव 6.90%
> ३ वर्षांची मुदत ठेव 6.90%
> ५ वर्षांची मुदत ठेव 7.70%
> ५ वर्षांची रेकरिंग ठेव 7.20%
> ५ वर्षांची ज्येष्ठ नागरिक याेजना 8.60%
> ५ वर्षांची मासिक उत्पन्न याेजना 7.60%
> ५ वर्षांची एनएससी 7.90%
> पीएफ फंड याेजना 7.90%
> किसान विकास पत्र 7.60%
> सुकन्य समृद्धी याेजना 8.40%