शिवकाळातील ‘होन’ नाण्यावर टपाल तिकीट, राज्यपालांच्या हस्ते आज होणार अनावरण

मुंबई, ६ जून २०२३ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत राज्याच्या सांस्कृतिक विभागाने शिवकाळातील ‘सुवर्ण होन’ नाण्यावर टपाल तिकीट काढले आहे. या टपाल तिकिटाचे अनावरण राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवनातील दरबार हॉलमध्ये करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांच्याच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने भारतीय टपाल विभागाच्या सहकार्याने टपाल तिकीट काढण्याचा निर्णय घेतला आहे. महाराजांचा ३५० वर्षांपूर्वी राज्यभिषेक सोहळा झाला त्यादिवशी महाराजांनी ‘शिवराई होन’ नावाचे सोन्याचे नाणे चलणात आणले होते.

आता या आधारीत सांस्कृतिक विभागाने हे टपाल तिकीट व्यवहारात आणले आहे, असं सांगितलं आहे. या टपाल तिकीटाच्या अनावरण सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, राज्यपांलाचे सचिव संतोष कुमार प्रामुख्याने उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा