रॅपिड टेस्टिंग किटच्या चाचणीवर आणखी काही दिवस स्थगिती

नवी दिल्ली,२४ एप्रिल २०२०:
कोरोनाव्हायरसचा कहर देशात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशात कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या २३ हजारांपेक्षा जास्त आहे, तर आतापर्यंत ७०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कोविड – १९ च्या रॅपिड टेस्टिंग किटच्या तपासणीस आणखी काही दिवस बंदी घालण्यात आली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) पाठवलेल्या वैद्यकीय टीम चा शोध अजूनही चालू आहे.

या महिन्याच्या सुरूवातीस सरकारने चीनकडून जवळपास ६.५ लाख जलद चाचणी किट विकत घेतले होते. आयसीएमआरने देशभरातील कोविड – १९ हॉटस्पॉटमधील सर्व लोकांच्या चाचणीचा सल्ला दिल्यानंतर त्यांचे वितरण देशभरात करण्यात आले. या किटसह चाचणी चार दिवसांपूर्वी सुरू झाली होती, परंतु राज्यांकडून आलेल्या तक्रारीनंतर या चाचणी किट वर दोन दिवस बंदी घालण्यात आली.

आयसीएमआरचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्री. रमन आर गंगाखेडकर म्हणण्यानुसार, या किटच्या परीक्षेच्या निकालातील त्रुटी लक्षात घेता एका राज्यातून आलेल्या तक्रारीच्या आधारे आयसीएमआरने अन्य तीन राज्यांना किटमधील तांत्रिक अडचण दूर होईपर्यंत टेस्ट्स थांबवण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे आता आणखी काही दिवस या किटच्या सहाय्याने होणाऱ्या चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा