पोट सुटलंय…तर मग उभे रहा

आजच्या तरुण पिढीची सर्वात मोठी समस्या निर्माण होऊ लागली आहे ती पोटाची (ढेरी). वजन काही केल्या कमी होत नाही. पोट वाढतच आहे. त्यामुळे अनेक मोठ्या कार्यक्रमांना जाताना सुटलेले पोट घेऊन जावे लागते. त्यामुळे आता घाबरण्याचे काहीच कारण नाही. फक्त उभे राहिल्याने वाढणाऱ्या वजनापासून मुक्ती मिळेल. असे एका संशोधनातून समोर आले आहे. उभे राहिल्याने कॅलरीज बर्न होतात. या गोष्टीला आहार तज्ञांनी देखील दुजोरा दिला आहे.

युरोप राष्ट्रातील मेयो क्लिनिकच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. ‘युरोपिअन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी’मध्ये तो प्रसिद्ध करण्यात आला आहे. संशोधकांनी याआधी वाढत्या वजनाविषयी झालेल्या ४६ संशोधनाचा आधार घेतला.
या संशोधनातील एकूण ११८४ व्यक्तींच्या माहितीच्या आधारे त्यांनी हा अभ्यास केला. या व्यक्तींचे सरासरी वय ३३ आणि सरासरी वजन ६५ किलो होते, असे या संशोधनाच्या अभ्यासिका Dr Fajdrwane Saeieddiedfard यांनी सांगितले.
‘व्हीएलसीसी’च्या अध्यक्षा वंदना ल्युथरा यांनी सांगितले की, लोकांना आपल्या लठ्ठपणामुळे विविध आजार आणि अडचणींना सामोरे जावे लागते. वजन कमी करण्यासाठी केवळ आहाराच्या पद्धती आणि पदार्थ बदलून अथवा टाळून चालणार नाही, तर त्यासाठी उभे राहणे हा देखील उत्तम उपाय आहे.

उभे राहिल्याने काय होते.
उभे राहिल्याने प्रतिमिनिटाला ०.१५ अधिक कॅलरीज घटतात.
जर व्यक्तीचे वजन ६५ किलो असेल तर दररोज प्रत्येकी ६ तास उभे राहिल्यास ५४ कॅलरीज घटू शकतात. म्हणजेच त्या व्यक्तीचे वर्षाला अडीच तर ४ वर्षांनी १९ किलो वजन घटू शकते.
भरपूर वेळ उभे राहणे कुणालाच आवडत नाही. ज्यांचे काम बैठे आहे, त्यांना तर उभे राहणे शक्य होत नाही. मात्र ज्या व्यक्ती दिवसाला १२ तास बसतात ते ६ तास उभे राहिले, तर त्यांना याचा फायदा नक्कीच होईल.

जास्तीत जास्त वेळ उभे राहिले तर वजन आणि पोटाच्या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा