अंबाजोगाई, बीड २२ फेब्रुवारी २०२४ : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८ वर धायगुडा-पिंपळा ते अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर ५५ किलोमीटर चे काम चौपदरी झाले असुन घाटनांदुर येथील सिमेंट नालीचे नीकृष्ठ काम केल्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत.
बाजारपेठेत जाण्याचा मुख्य रस्त्यावर घाटनांदुर येथे खड्डे झाल्याने वाहनधारकांना व नागरिकांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यामुळे रात्रीचा प्रवास म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. मजबुती करताना टिकाऊ रहावे यासाठी सिमेंट नालीचे बांधकाम १ वर्षापूर्वी केले होते, मात्र गुत्तेदारांनी सरकारचे लाखो रुपये घेऊन निकृष्ट दर्जाचे सिमेंट नालीचे काम केल्यामुळे नालीवर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडुन अपघात होत आहेत.
पिंपळा-धायगुडा ते अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेले घाटनांदुर येथे साईट सिमेंट नालीचे निष्क्रिय दर्जाचे काम केल्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर संबंधित गुत्तेदार आणि कंपनीवर कारवाई करून सिमेंट नालीचे काम चांगल्या दर्जाचे करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनीधी : अरुन गित्ते