मागासलेल्या विद्यार्थ्यांचा पौर्णिमा तावरे यांच्याकडून गुणगौरव

बारामती, दि. ७ ऑगस्ट २०२०: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जन्मशताब्दीचे औचित्य साधुन मांग गारूडी समाजातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाचे आयोजन बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य संघटक तानाजी पाथरकर यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या आदेशानुसार समारंभाचे आयोजन केले होते. बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते बारामती शहरातील दहावी व बारावी यंदाच्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

मांग गारूडी समाजातील दहावी ,बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात बारामती नगरीच्या नगराध्यक्षा तावरे बोलत होत्या. महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपण आपल्या संस्कृतीचा वारसा जपला पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले.

दहावी बारावी झाल्यानंतर आता पुढे काय करायचं या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन पुढील कारकीर्द यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद दिले. नेहा राजू खलसे,साहिल बाळू कसबे, कन्हैया श्रावण पाथरकर, ज्ञानेश्वरी सुखदेव उफाडे, गीतांजली तानाजी पाथरकर, प्राजक्ता विश्वास लोंढे, निखिल सचिन सकट, गौरी लखन भाले, पप्पू लखन भाले या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सतीश खूडे,शब्बीर शेख, पत्रकार स्वप्निल कांबळे, विकास कोकरे, सुरज देवकाते, सुखदेव ऊफाडे, सचिन सकट, अभिमन्यू लोंढे, विश्वास लोंढे, राजू खलसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल यादव.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा