गोल पोस्ट स्पॉटलाइट प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांना कोणतेही आमंत्रण नाहीः राणा- मिहेका लग्न

प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांना कोणतेही आमंत्रण नाहीः राणा- मिहेका लग्न

हैदराबाद, १२ ऑगस्ट २०२० : राणा डग्गुबाती आणि मिहेका बजाज यांनी जवळच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या उपस्थितीत ८ ऑगस्टला विवाहबंधनात स्वत:ला बांधले . हैदराबादमधील रामानायडू स्टुडिओमध्ये जवळचे मित्रमंडळी, स्टाईलिश स्टार अल्लू अर्जुन, मेगा पॉवर स्टार राम चरण, अक्केनेनी नागा चैतन्य आणि सामन्था हे राणा डग्गुबाती आणि मिहेका बजाज यांच्या लग्नात दिसून आले. पण राणाचे निकटचे मित्र प्रभास आणि अनुष्का शेट्टी अनुपस्थिती सर्वांना खटकत होती. प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांना लग्नाचे आमंत्रण मिळाले नाही याचीच सर्वत्र चर्चा होती. केवळ प्रभास आणि अनुष्का शेट्टी नव्हे तर कोविड -१९ च्या निर्बंधामुळे फिल्म इंडस्ट्रीतील कोणालाही आमंत्रण देण्यात आले नाही.

लग्नाच्या निमित्ताने मिहेका बजाजने एक शाही लेहंगा परिधान केला होता ज्यात हाताने जरदोसी, चिकनकरी आणि सोन्याच्सा धातूचे काम केले होते. तिचा जबरदस्त पोशाख करण्यासाठी १०,००० मनुष्य-तास लागले असून तो खरोखरच उत्कृष्ट आहे. मिहेका बजाजने तिच्या लग्नात भारी पारंपारिक पोल्की, डायमंड आणि पन्ना दागिने परिधान केलते. रॉयल टच देण्यासाठी तिने विणलेल्या सोन्याच्या दुप्पटाही सुशोभित केला होता.

२०१० मध्ये रिलीज झालेल्या बाहुबली चित्रपटातून राणा डग्गुबाती हा भल्लाळदेव म्हणून ओळखला गेला होता. सध्या तो विराट पर्वममध्ये साई पल्लवीसोबत काम करत आहे. दरम्यान तो सध्या प्रभास बरोबरच्या राधे श्यामसाठी काम करत आहे तर अनुष्का शेट्टी बरोबरच्या निषाधामच्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version