नांदगावला प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्स्फूर्तपणे साजरी

नांदगाव, नाशिक २२ फेब्रुवारी २०२३ : सुतार समाज्याचे आराध्य दैवत प्रभु श्री विश्वकर्मा महाराज जयंती उत्सव सालाबादाप्रमाने नाशिकच्या नांदगाव येथील हनुमाननगर येथील श्री विश्वकर्मा महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. श्री विश्वकर्मा महाराजांच्या मुर्तीची विधिवित पुजा व सत्यनाराण महापुजा रमेश पेंढारकर व सौ फुलवंता पेंढारकर यांनी सपत्नीक केली, तर महाआरती विश्वकर्मा सुतार समाज विकास संस्थेचे पदाधिकारी यांनी सपत्नीक केली. या प्रसंगी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक चंद्रशेखर कवडे, एड सचिन साळवे, आप चे जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडघुले, संतोष गोसावी नंदू पाटील,जेष्ट पत्रकार संजीव निकम, सुरेश शेळके,आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

जयंतीनिमित्त समाज बांधवांना जेष्टे नेते बापुसाहेब कवडे, आमदार सुहास कांदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेज कवडे यांनी शुभेच्छा दिल्यात. या प्रसंगी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख अतिथींचे स्वागत विश्वकर्मा सुतार समाज विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, श्री विश्वकर्मा भगवान हे सर्व समाजाचे दैवत आहे. तालुक्यात सुतार समाजाचे संघटन असून याचे फलित नांदगाव शहरात प्रभू विश्वकर्मा भगवानचे भव्य मंदिर उभारले असून या बरोबरच या ठिकाणी इतर विकास कामे जोमात सुरू आहे. आमदार सुहास कांदे यांनी मंदीर परिसरात सभामंडपसाठी निधी दिल्याबद्दल समाज्याच्या वतीने आभार मानण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित महिलांनी हळदी कुंकवाचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उपस्थिताना विश्वकर्मा युवा मंडाळाचे अशोक पेंढारकर यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला. विश्वकर्मा सुतार समाज विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय कदम, संचालक नंदुलाल अहिरे, सुभाष पेंढारकर, मधुकर खैरनार, राजेंद खैरनार, दिगंबर गवळे, दयाराम सूर्यवंशी, सचिव बाबासाहेब कदम, खजिनदार दिपक मोरे, अशोक कदम, सोपान कदम आदी पदाधिकारी व महिला वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा