प्रादुर्भाव टाळण्यासाठी कर्जत मधील दुकाने बंद करण्याची मागणी

कर्जत, दि. १६ जून २०२०: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कर्जत मधील दुकानाला सायंकाळी पाच वाजे पर्यंत उघडे करण्याची परवानगी असताना कर्जत शहरातील दुकाने पाच नंतर देखील उघडे असतात यामुळे कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड आणि नगरपालिकेचे मुख्य गोविंद जाधव यांच्यासह इतर कर्मचारी काल दिनांक १५ रोजी रस्त्यावर उतरले.

जी दुकाने उघडी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कर्जत मधील दुकानाला सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत वेळ देण्यात आली होती. पाच नंतर दुकाने बंद करण्यात यावीत असा जिल्हा अधिकारी यांचा आदेश असताना देखील दुकाने उघडली असल्याचे निदर्शनास आले होते.

दुकानदारांनी जिल्हा अधिकारी यांच्या आदेशचे पालन न केल्या मुळे कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड आणि नगरपालिका कर्मचारी यांनी काल दिनांक १५ रोजी रस्त्यावर उतरललेे पाहण्यास मिळाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा