दिल्ली: प्रज्ञा ठाकूर यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोप आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा भोपाळमध्ये पराभव केला होता. सध्या त्यांच्यावर बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्ह्यांची प्रकरणे आहेत.
भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संरक्षणविषयक सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहेएकूण २१ सदस्यांची ही समिती आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या समितीचे अध्यक्ष आहेत.