मानवतेच्या जाणिवेतून राबवित असलेला ‘डिक्की’चा उपक्रम स्तुत्य : डॉ. मोराळे

पुणे, दि.१८मे २०२० : कोरोनाच्या संकटामुळे टाळेबंदीमध्ये अडकलेले मजूर, कामगार, बेघर नागरिक तसेच विद्यार्थी यांचे अन्नावाचून हाल होऊ नयेत. या मानवतेच्या जाणिवेतून ‘डिक्की’ तर्फे गरीब गरजूंसाठी करण्यात आलेल्या अन्न वितरण व्यवस्थेचा उपक्रम हा स्तुत्य आहे, असे मत अपर पोलीस आयुक्त डॉ. अशोक मोराळे यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, राजेश बाहेती, भारत आहुजा, राजू वाघमारे, महेश राठी, चेतन पटेल हे उपस्थित होते.
दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे शहरातील ७ निवारागृहातील बेघर नागरिकांसाठी सकाळचा नाष्टा, दुपारचे भोजन आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था गेल्या ५३ दिवसांपासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या आवारातील कम्युनिटी किचन येथून करण्यात येत आहे. मोराळे यांनी या ठिकाणी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड व अन्य अधिकाऱ्यांच्या मदतीने हे तयार भोजन आणि नाष्टा वितरीत करण्यात येतउ आहे. भोर, वेल्हा आणि मावळ तालुक्यातील अति दुर्गम भागातील ९०० आदिवासी कुटुंबांना २० दिवस पुरेल इतके रेशन तर पुणे शहरातील १२९ वस्त्यांतील १५ हजार ५०९ कुटुंबांना तांदूळ, गव्हाचे पीठ, मसाला, मीठ, डाळ यांचा समावेश असलेल्या किराणा मालाचे किट या संस्थेमार्फत वितरित करण्यात आले आहे. संस्थेच्या या उपक्रमाचा आजवर एकूण १ लाख ८० हजार नागरिकांना लाभ झाला असल्याचे यावेळी कांबळे व बाहेती यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा