प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या हल्ल्याचा कट उधळला

15

श्रीनगर :प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याचा कट जम्मू काश्मीर पोलिसांनी उधळून लावला आहे. जैश-ए- मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकंही जप्त करण्यात आली आहेत. श्रीनगरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांना पोलिसांनी स्फोटकांसह अटक केली आहे. या सर्वांनी प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक केलेल्या या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी स्फोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या, हातबॉम्ब आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी हजरतबल परिसरात दोन ग्रेनेड हल्ले करण्याचा डाव रचत होते. त्यांच्याजवळून मोठा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. ज्या पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आले आहे त्यात सदरबल हजरतबलतील एजाज अहमद शेख, असार कॉलनी हजरतबलमधून उमर हमीद शेख, असार कॉलनीमधील इम्तियाज अहमद चीका उर्फ इमरान, इलाहीबाग सौरातील साहिल फारूक गोज्री आणि सदरबल हजरतबलच्या नसीर अहमद मीरचा समावेश आहे.
या दहशतवाद्यांजवळून एक हातोडी, एक वॉकी टॉकी, तीन बैटरी, एक बॅटरी चार्जर, एक ऑन-ऑफ स्विच, एक पाऊच, तीन क्वायल, तीन पॅकेट स्फोटक सामग्री, एक बॅग, चार टेप रोल आणि एक अडीच लीटरची निट्रिक अॅसिडची बॉटल हस्तगत केली आहे.
यासोबत पोलिसांनी १४३जिलेटिन रॉड, सात सेकेंड्री अॅक्सप्लोसिव्ह, एक सायलेंसर, ४२ डेटोनेटर्स, एक सीडी ड्राईव्ह देखील जप्त केला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा