सत्ता संघर्षाच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकरांनीं दिली प्रतिक्रिया

मुंबई, २८ सप्टेंबर २०२२ : शिवसेनेवर शिंदे गटाने केलेल्या दाव्याची सुनावणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला परवानगी दिल्यानंतर निकालावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.

या वर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की संविधानाने आणि संसदेने निवडणूक आयोगाची तटस्थता जपली होती, त्यांच्यावर शिंतोडे उडवले जाणार नाही याची दक्षता घेतली होती. परंतु निवडणूक आयोगाने स्वतःच्याच अधिकाराखाली Symbol Order १९६८ जी काढली त्यामध्ये Section १५ प्रमाणे एखाद्या पक्षात जर निवडणूक चिन्हावरून विवाद असेल तर आम्हांला हस्तक्षेप करता येतो असे प्रावधान आहे.

हे Syambol Order मधील section १५ संविधानिक आहे की नाही याची तपासणी करण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाला यानिमित्ताने आली होती. परंतु दुर्दैवाने ती तपासणी झाली नाही आणि निवडणूक आयोगास शिवसेनेच्या प्रकरणात निर्णय घ्या असे सांगण्यात आले. संविधानाने आणि संसदेने निवडणूक आयोगाची जी तटस्थता जपली होती दुर्दैवाने या निर्णयामुळे ती धोक्यात आली आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

जर यापुढे पक्षातील विवादावर निवडणूक आयोग निर्णय घेणार हा जो संदेश या निर्णयातून गेला आहे तो चुकीचा आहे असे मी मानतो. निवडणूक आयोगाला आपण Frankenstein करायला निघालो आहोत का, अशी दाट शक्यता निर्माण होते, असं म्हणत आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काल न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं पुनर्विलोकन करण्याची मागणी आंबेडकरांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा