सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानप्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड

5

नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट २०२०: सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड ठोठावला आहे. १५ सप्टेंबरपर्यंत दंडाची रक्कम न भरल्यास प्रशांत भूषण यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि तीन वर्ष वकिली करता येणार नाही. न्यायालय अवमान प्रकरणी प्रशांत भूषण यांना न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या घटनापीठानं भूषण यांनी न्यायालय अवमान प्रकरणात शिक्षा सुनावली. सर्वोच्च न्यायालयानं १४ ऑगस्टला भूषण यांनी दोषी ठरवलं होतं.

काय आहे प्रकरण ?

प्रशांत भूषण यांनी दोन ट्वीट करून सरन्यायाधीश शरद बोबडे व सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. २७ जून रोजी केलेल्या ट्विटमध्ये भूषण यांनी न्यायालयाच्या सहा वर्षांच्या काळातील कामकाजावर टीका केली होती. त्यापूर्वी २२ जून रोजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासह चार माजी मुख्य न्यायमूर्तींवरही टीका केली होती. या ट्वीटमुळे लोकशाहीचे खांब कमकुवत होत असल्याचे निरीक्षण नोंदवत सुप्रीम कोर्टाने प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोषी ठरवलं होतं.

१४ ऑगस्ट रोजी त्यांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं. या निकालावर भूषण यांनी, न्यायालयाने दिलेली शिक्षा मी भोगण्यास तयार असल्याचे निवेदन न्यायालयात केलं होतं. या विधानाचा फेरविचार करण्याची सूचना न्यायालयाने केली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा