प्रशांत गडाख यांना “गाव तिथे वाचनालय” साठी पुरस्कार जाहीर

अहमदनगर : महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा, पुणे या नामांकित संस्थेद्वारे दिला जाणारा गौरव पुरस्कार यावर्षी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांना जाहीर करण्यात आला आहे.

प्रतिवर्षी स्व. अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतिदिनी दिला जाणारा हा पुरस्कार प्रशांत गडाख यांच्या ’गाव तिथे वाचनालय’ या अभियानासाठी त्यांना घोषित करण्यात आला आहे.
प्रसारिणी सभेचे अध्यक्ष उध्दव कानडे व कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांनी पुणे येथे या पुरस्काराची घोषणा केली.
महाराष्ट्रातील सामाजिक, शिक्षण, विज्ञान व साहित्य क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाते.
पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी ६ वाजता पुणे येथील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात होणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा