पुणेकरांना प्रवास परवाना मिळवण्यासाठी काय करावे लागेल…

37

पुणे, १ मे २०२०: लॉक डाउन मुळे अनेक नागरिक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांच्यासाठी सरकारने दिलासादायक बातमी दिली आहे. यामुळे त्यांना आता आपल्या घरी परतता येणार आहे. यासाठी सरकारने काही अटी घातल्या आहेत तसेच त्यांची पूर्तता कशी करावी याबाबत देखील माहिती पुरविली आहे. त्याबाबत तपशील पुढे दिला आहे.

महाराष्ट्रामधील प्रवासी /राज्यांतर्गत प्रवास
नागरिकांसाठी:
• पुणे शहर तहसिल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील
१. एरंडवणा
२. येरवडा
३. औंध
४. बोपोडी (खडकी)
५. पर्वती ( सहकारनगर, मुकंदनगर
६. दर्शन, दत्तवाडी.)
७. घोरपडी पेठ, कोरेगाव पार्क
८. मुंढवा, केशव नगर
९. शिवाजीनगर, गोखले नगर, वडारवाडी
१०. बिबवेवाडी (मार्केट यार्ड गुलटेकडी) पुणे शहर व सर्व पेठा

सदर भागातील नागरिकांना त्यांच्या मुळ गावी जायचे आहे. त्यांनी त्यांची माहिती
tahasildarpunecity@gmail.com या Email Id वर पाठवावी.

माहितीचे स्वरूप:

१. संपुर्ण नाव –
२. सध्याचा पत्ता –
३. मोबाईल नंबर –
४. व्यवसाय – विद्यार्थी/ कामगार/नोकरी/ अन्य – त्याचा पत्ता
५. मूळ गावचा पत्ता – गाव, तालुका, जिल्हा, राज्य
६. प्रवास कसा करणार आहात – स्वत:चे वाहन/ सार्वजनिक वाहन
७. किती लोक प्रवास करणार –

• तसेच हवेली कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील
बाणेर, कोंढवा, धनकवाडी, बालाजी नगर, सिंहगड रोड, धायरी, विश्रांतवाडी, चंदननगर,
हडपसर, मांजरी, कोथरूड, बालेवाडी, इत्यादी भागातील नागरिकांनी त्यांची माहिती
tahasildarhavelipune@gmail.com या Email Id वर पाठवावी.

• तसेच मुळशी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील पाषाण, सुस, वाकड, हिजवडी, बावधन, इत्यादी भागातील नागरिकांनी त्यांची माहिती
tahasildarmulshi@gmail.com या Email Id वर पाठवावी.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे