पुणे, २९ नोव्हेंबर २०२२ : भारतीय वाहन बाजारात नवनवीन वेगवेगळी इलेक्ट्रिक वाहनं लाँच होत आहेत. दरम्यान, इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप कंपनी प्रवीग डायनॅमिक्सने भारतात त्यांची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही प्रवीग डेफी लाँच केली आहे. ही पूर्णपणे मेड इन इंडिया इलेक्ट्रिक कार आहे.
बंगळुरूमध्ये EV स्टार्टअप Pravaig ने आपली पहिली इलेक्ट्रिक SUV Daffy लॉंच केली आहे. तर या SUV ची एक्स-शोरूम किंमत ३९,५०,००० रुपये आहे. एसयूव्ही ५१००० रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते. एकदा चार्ज केल्यानंतर Pravaig SUV ५०० किलोमीटर धावेल म्हणजेच मुंबईपासून बेळगाव हे शहर ४८४ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. तर ही कार सिंगल चार्जिंगवर मुंबई ते बेळगावपर्यंत नॉनस्टॉप प्रवास करू शकते; तसेच ही कार २१० किमी प्रतितास इतक्या वेगाने धावू शकते.
Pravaig SUV फीचर्स
केबिनमध्ये कनेक्टिव्हिटी फंक्शन्ससह मोठी टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, डेव्हिएलेट ऑडिओ सिस्टीम, एअर प्युरिफायर, USB चार्जिंग पोर्ट, वायरलेस फोन चार्जिंग, तसेच रियर सीट्ससाठी टचस्क्रीन सिस्टीम, स्टीरियो सिस्टीम, फ्लेयर्ड फ्रंट फेंडर, मल्टिपोक्स अलॉय व्हील, टेलगेटवर एलईडी लॉंग स्ट्रीप आणि ऑल व्हील ड्राइव्हसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
Pravaig SUV पॉवर सिस्टीम
प्रवीग इलेक्ट्रिक एसयूव्हीमधील पॉवरट्रेन सिस्टीमबद्दल बोलायचं झाल्यास यामध्ये 90.2kwh क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक ऑफर करण्यात आला आहे. यासह कारमध्ये एक इलेक्ट्रिक मोटर देखील जोडण्यात आली आहे. ही मोटर ४०२ बीएचपी पॉवर आणि ६२० न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकते. यामध्ये देण्यात आलेली बॅटरी ३० मिनिटांत ० ते ८० टक्के चार्ज होते.
ही कार कंपनीने एकूण ११ रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केली आहे. यामध्ये Bordeaux, Lithium, Emperor Purple, Siachen Blue, Indigo, Moon Gray, Haldi Yellow, 95.56 Green, Kaziranga Green, Vermillion Red, Shiny Black या रंगांचा समावेश आहे.
न्यूज प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे