गर्भवती महिलांसाठी आता ‘यशोदा माता अंगत-पंगत योजना’

मुंबई : आदिवासी, दुर्गम भागांतील गर्भवतींचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी महिला व बालविकास विभागाने ‘यशोदा माता अंगत-पंगत’ ही अभिनव योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ‘यशोदा अंगत-पंगत’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना राज्यभरात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गरोदर मातांनी अंगणवाडी केंद्रात एकत्र येऊन सहभोजन करावयाचे आहे. सहभोजना दरम्यान अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्या (एएनएम) गरोदर मातांना पोषण आहाराबाबतचे महत्त्व सांगण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागामार्फत भोजनानंतर लोह आणि फॉलिक ॲसिडच्या (आयएफए) गोळ्या अंगणवाडी केंद्रातच देण्यात येणार आहे.
राज्यातील ९७ हजार अंगणवाड्या व १३ हजार मिनी अंगणवाड्यांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सध्या प्रायोगिक तत्त्वावर नांदेड जिल्हा परिषदेत राबविण्यात आलेली ही योजना आता संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा