बॉलिवूडमध्ये सिरीयल किसर म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता इम्रान हाशमी ‘द बॉडी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर युट्युबवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
ट्रेलर कसा आहे? : ट्रेलरमध्ये चित्रपटाची कथा गूढ स्वरूपाची असल्याचे जाणवते. चित्रपट काहीसा भीतीदायक तसेच सस्पेन्स असणारा असेल असे ट्रेलरवरून स्पष्ट होते.
कथानक काय असणार? :
ऋषि कपूर एका प्रसिद्ध उद्योगपती असलेल्या माया यांच्या मृत्यूबाबत तपास करताना दिसत आहे.
मायाची बॉडी मिसिंग असून इमरान हाशमीवर खून केल्याचा संशय दाखविण्यात आला आहे.
तसेच ऋषि कपूर मृत्यूचे रहस्य शोधत स्ट्रगल करत असताना दिसतात.
परंतु ट्रेलर पाहता माया यांचा मृत्यू झाला की नाही याबाबत साशंकता वाटते.
कलाकार : अभिनेता इम्रान हाशमी, ऋषि कपूर, अभिनेत्री सोभिता धुलिपाला, रुखसार रहमान, वेदिका कुमार इत्यादी
ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा : http://bit.ly/351DiNY
हा चित्रपट 2012मध्ये प्रदर्शित झालेल्या स्पॅनिश चित्रपटाचा हिंदी रीमेक असून याचे दिग्दर्शन जीतू जोसेफ यांनी केले आहे. हा चित्रपट 13 डिसेंबर ला प्रदर्शित होणार आहे.