जळगावच्या अय्यप्पा स्वामी मंदीरात कार्तिक पौर्णिमा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

7

जळगाव, २१ नोव्हेंबर २०२३ : जळगाव शहरातील निवृत्ती नगर मधील केरळी महिला ट्रस्टचे अयप्पा स्वामी मंदीर २६ नोव्हेंबर रोजी खुले करण्यात येणार आहे. २६ नोंव्हेबरपासून कार्तिका पोर्णिमा सूरू होत असल्याने मंदिर समितीने तयारी सूरू केली आहे. संपुर्ण केरळी पध्दतीने बांधलेले हे मंदीर गेल्या २५ वर्षापासून कार्तिकी पोर्णिमेनिमीत्त दर्शनासाठी खुले करण्यात येते. या मंदिरात कार्तिकस्वामी व्यतिरीक्त नवग्रह व इतर देवतांची देखिल मंदीर असून ते वर्षभर दर्शनासाठी खुले असते.

या मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी भाविक मोठया प्रमाणात येत असतात. अभिषेक व पूजेसाठी गुरूजीसह स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून येत्या २६ नोव्हेंबरला कार्तिक नक्षत्र सकाळी ११ वा.१० ला सुरू होत असुन दु. ३ वा ५३ मिनिटांनी कार्तिक पौर्णिमा सूरू होत आहे. २७ नोव्हेंबर रोजी दु.२ वा १५ मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होणार आहे.

मंदिर दर्शनासाठी २७ नोव्हेंबर पर्यंत खुले करण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविकांनी दर्शन घ्यावे असे आवाहन केरळी महिला ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : डॉ.पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा