इंदापुरात वादळी वाऱ्यासह गारांसह पावसाची हजेरी

10

इंदापूर, दि.१६ मे २०२० : इंदापूर तालुक्यातील पळसदेव, लोणी देवकर, कळस आदी परिसरात दुपारपासूनच सुसाट्याचा वारा सुटला होता. दुपारपासून जोरदार वारे सुटल्याने शेतकऱ्यांची शेतमाल झाकण्यासाठी धांदल उडाली होती.
सायंकाळी मात्र या परिसरात पावसाने गारांसह हजेरी लावत नागरिकांची त्रेधातिरपीट उडवून दिली जाेरदार पावसाने संपूर्ण परिसर झोडपून काढले.

काहीवेळ गारांसह पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तर काही ठिकाणी ढग दाटून आल्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली
आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे