नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्पाचे दिल्लीत सादरीकरण

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी २०२३ : महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश मिश्रा यांनी पीएमओ कार्यालयाच्या सचिवांसमोर सादरीकरण करीत निओ मेट्रोचा सविस्तर प्रकल्प आराखडा पीएमओ कार्यालयाकडे नुकताच सुपूर्द केला. पीएमओ कार्यालयाकडून या प्रस्तावाचा; तसेच आराखड्याचा अभ्यास केला जाणार आहे. आराखडा अंतिम मान्यतेसाठी मंत्रिमडळ बैठकीत सादर केला जाईल.

नाशिकमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प लवकरच मार्गी लागेल, असे सांगितले होते. आपल्या देशात पारंपरिक आणि कन्व्हर्टेबल अशा दोनच प्रकारच्या मेट्रो असाव्यात, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले होते. देशभरात एकाच प्रकारचा मेट्रो प्रकल्प उभारला जावा आणि हा प्रकल्प मेक इन इंडिया असला पाहिजे व सर्व सुटे भाग आपल्या देशातच तयार व्हावेत.

फडणवीस यांनी दिल्ली दरबारी आपले राजकीय वजन वापरत नाशिकच्या मेट्रो निओ प्रकल्पाला उशीर का होईना, चाल दिली आहे. यावेळी पीएमओ कार्यालयात निओ मेट्रोचा डीपीआर सादर केला. यावेळी महामेट्रोचे सुनील माथुर; तसेच आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मेट्रो निओच्या सचिवांसह अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण केले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा