राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गुजरात दौर्‍यावर, अहमदाबादमध्ये चालवला चरखा!

अहमदाबाद, ३ ऑक्टोबर २०२२: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून आज त्या अहमदाबादमध्ये दाखल झाल्या आहेत. अहमदाबाद मधील गांधी नगरमध्ये आरोग्य, सिंचन, पाणीपुरवठा आणि बंदर विकासाशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते केली जाणार आहे, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपती मुर्मू यांनी आज साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी मुर्मू यांनी चरखा फिरवून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आदी उपस्थित होते.

हे आहेत ४ ऑक्टोबरचे कार्यक्रम

४ ऑक्टोबर रोजी, राष्ट्रपती महिला उद्योजकांसाठी गुजरात विद्यापीठाच्या स्टार्ट-अप प्लॅटफॉर्म ‘हर स्टार्ट’ लाँच करतील आणि गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद येथे शिक्षण आणि आदिवासी विकासाशी संबंधित विविध प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा