प्रचंड विरोधानंतरही कृषी विधेयकावर राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी; विधेयकाचं कायद्यात रूपांतर 

नवी दिल्ली, २७ सप्टेंबर २०२०: मोदी सरकारनं मांडलेलं कृषी विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात पास झालं होतं. त्यावर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्यामुळे विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं आहे. 

मोदी सरकारच्या या कृषी विधेयकाला काँग्रेसह इतर विरोधकांनीही तीव्र विरोध केला होता. पंजाब आणि हरियाणा सारख्या राज्यांमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरला होता. मात्र एवढ्या विरोधानंतरही राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानं या विधेयकाचं अखेर कायद्यात रूपांतर झालं आहे. 

दरम्यान महाराष्ट्रात हे विधेयक लागू होऊ देणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही महाराष्ट्रात कृषी विधेयकांवर अंमलबजावणी होणार नाही, असं म्हटलं आहे. “संसदेत पारित केलेली विधेयकं शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे आम्ही याचा विरोध करत आहोत. महाविकास आघाडीसुद्धा या विधेयकांना विरोध करणार आहे आणि या विधेयकांची महाराष्ट्रात अंमलबजावणी होणार नाही. शिवसेनाही आमच्यासोबत आहे.” असंही बाळासाहेब म्हणाले. 

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा