इजिप्त २५ जून २०२३: अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इजिप्तच्या दौऱ्यावर आहेत. आज कैरो येथे इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी, पंतप्रधान मोदींना कैरो येथे ऑर्डर ऑफ द नाईल पुरस्काराने सन्मानित केले. हा इजिप्तचा सर्वोच्च राज्य सन्मान आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आज हेलिओपोलिस वॉर मेमोरियल आणि अल हकीम मशिदीला भेट दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यां दोघांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी अब्देल फताह अल-सिसी यांनी पंतप्रधान मोदींना ऑर्डर ऑफ द नाईल पुरस्कार प्रदान केला. हा इजिप्तचा सर्वोच्च राज्य सन्मान आहे. मोदी यांनी कैरो येथील हेलिओपोलिस युद्ध स्मशानभूमीला भेट दिली आणि पहिल्या महायुद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली.
भारतीय डायस्पोरातील बोहरा समुदायाचे सदस्य शुजाउद्दीन शब्बीर तांबवाल म्हणाले की, आमच्यासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे, आज पंतप्रधान मोदी येथे आले. त्यांनी आमच्याशी संवाद साधला. त्यांनी आमच्या बोहरा समाजाच्या हिताची विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्याशी संवाद साधला तेव्हा आम्हाला एक कुटुंब असल्यासारखे वाटले.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर