नगरोटा चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानं पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक

नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर २०२०: नगरोटा चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा दलाचं कौतुक करताना सांगितलं की आमच्या सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा मोठं शौर्य व कौशल्य दाखविलं आहे. त्यांच्या दक्षतेनं जम्मू-काश्मीरमधील लोकशाहीवर होणाऱ्या भ्याड हल्ल्याला रोखलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी २ ट्वीट करून नगरोटा चकमकी आणि सुरक्षा दलाच्या शौर्याबद्दल सांगितलं. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘पाकिस्तान-आधारित दहशतवादी संस्था जैश-ए-मोहम्मदमधील ४ दहशतवाद्यांचा खात्मा आणि त्यांच्यासमवेत मोठ्या प्रमाणात शस्त्रं आणि स्फोटकांचा साठा हे दर्शवते की मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्याचा त्यांचा प्रयत्न आपल्या सैनिकांनी विफल केला आहे.

यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या नगरोटा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, एनएसए अजित डोभाल, परराष्ट्र सचिव व सर्व गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. असं म्हटलं जातं की २६/११ च्या पार्श्वभूमीवर दहशतवादी एक मोठा कट रचण्याचा प्रयत्न करीत होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा