पंतप्रधान मोदी शेठ… डिजे लावून पाहूया का?

मुंबई, दि. १४ जुलै २०२०: सध्याचा काळात भारतात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तर देशातील लाॅकडाऊन फेल झाले असे कुठेतरी दिसत आहे. अनेकजण या परिस्थितीला जबाबदार केंद्र सरकारला धरुन त्यांच्यावर टिकेची झोड, उपरोधक टोले, खोचक प्रश्न विचारले जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवर बाॅलिवूड मधील संगीत दिग्दर्शक आणि गायक विशाल दादलानी यांनी पंतप्रधान मोदी यांना उपरोधिक टोला लगावला आहे . विशाल दादलानी हे सोशल मिडियावर नेहमीच अग्रेसर असतात व ते अनेक विविध गोष्टी या माध्यमातून करत असतात.

विशाल दादलानी याने ट्विट करुन सरकारवर टीका केली.”शेठ, देशात ५०० करोना पेशंट होते तर टाळ्या थाळ्या वाजवल्या आता आठ लाख झाले आहेत. आपण डीजे वाजवून पाहूया का?” असं ट्विट करत त्याने पंतप्रधान मोदींना उपरोधिक टोला लगावला आहे.

भारतची परिस्थिती कोरोनाच्या बाबतीत हाताबाहेर जात आसून सरकार युद्धपातळीवर काम तर करत आहे पण त्याचे परिणाम मात्र सकारत्मक येत नसल्याचे चित्र आहे आणि अशात आनेक राज्यांनी लाॅकडाऊनचा पर्याय परत अवलंबला आहे. तर हातावर पोट आसणा-या अनेक नागरिकांच्या पोटाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भारत कोरोनाच्या यादीत जागतिक स्तरावर ३ -या स्थानी असून भारतातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेेेेने सांगितले आहे की जगातील सर्व देशांनी सतर्क राहण्याचे कार्य करायचे आहे कोरोनाचा वाईट काळ हा अजून यायचा बाकी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा