पंतप्रधान मोदी आज सुरू करणार भारताची पहिली सी-प्लेन सेवा

केवडिया, ३१ ऑक्टोबर २०२०: पंतप्रधान मोदी शनिवारी गुजरातच्या केवडियामध्ये देशातील पहिली समुद्र विमान सेवा (सी प्लेन) सुरू करणार आहेत. ३०० मीटर रुंदीच्या तलावांमध्ये किंवा जलाशयामध्ये उतरणारं हे सी प्लेन अनेक दृष्टीतून महत्त्वपूर्ण आहे. बदलत्या भारताचा हा एक नवीन ट्रेंड आहे. चला या समुद्री विमानाच्या खास गोष्टींवर नजर टाकू तसेच हे जाणून घेऊ की समुद्री विमान भारतातील आगामी काळातील दळणवळण शैली कशी बदलू शकतं. आता या विमानाच्या सहाय्यानं लँडिंग पाण्यामध्येच केलं जाईल इतकंच काय तर विमानाचं टेक-ऑफ देखील पाण्या मधूनच केलं जाईल. अशा प्रकारची टेक्नॉलॉजी भारतात पहिल्यांदाच आली आहे.

देशातील पहिली सी प्लेन सेवा आजपासून सुरू होत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला ही भेट देत आहेत. ही सागरी विमानसेवा साबरमती रिव्हरफ्रंटपासून केवडियामध्ये उपस्थित असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत सुरू केली जात आहे. सध्या सी प्लेन अहमदाबादला पोहोचलं आहे.

यापूर्वी २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पीएम मोदी समुद्री विमानात प्रवास करताना दिसले होते. तेव्हा पंतप्रधानांनी साबरमती नदीपासून मेहसाणा जिल्ह्यातील धारोई धरणावर समुद्री विमानानं प्रवास केला. बरेच लोक या वस्तुस्थितीचे साक्षीदार बनले होते, परंतु आता हे अनोखं समुद्री विमान गुजरातमध्ये सामान्य लोकांना देखील उपलब्ध होईल.

सी प्लेनशी संबंधित खास गोष्टी

• समुद्री विमान जमिनीवरून तसेच पाण्यातूनही उड्डाण करू शकतं

• समुद्री विमान पाण्यावर आणि जमिनीवर उतरवता येतं

• हे सी प्लेन केवळ तीनशे मीटरच्या धावपट्टीवरून देखील उड्डाण करू शकतं

• यासह केवळ तीनशे मीटरच्या जलाशयांमध्ये किंवा तलावांमध्ये देखील हे सी प्लेन लँडिंग किंवा टेक ऑफ करू शकतं

• हे उभयचर (एंफीबियस) श्रेणीचं विमान आहे.

• १९ प्रवासी एकाच वेळी सी प्लेनमध्ये प्रवास करण्यास सक्षम असतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा