प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजस्थान इथल्या शांतीपुतळ्याचं केलं अनावरण

पाली , १६ नोव्हेंबर २०२० : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजस्थानमधल्या पाली इथे दृकश्राव्य प्रणालीद्वारे जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरची महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या शांतीमुर्तीचं अनावरण करण्यात आलं.

जैनाचार्य यांच्या प्रेरणेमुळे देशभरातल्या ५० हून अधिक ठिकाणी रुग्णालयं,शाळा,शैक्षणिक संस्था,महाविद्यालय,अभ्यासकेंद्र कार्य़रत आहेत एकात्मता आणि बंधूभाव यांचा संदेश प्रसारित होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.आपलं आयुष्य वेचणाऱ्या महाराजांचा त्यांनी गौरव केला. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकता शिल्प आणि जैनाचार्यांची शांतीमुर्ती या दोन्हींचं अनावरण करण्याचं सौभाग्य मिळाल्याबद्दल त्यांना आनंद झाल्याचं ते म्हणाले.

भगवान महावीरांचे विचार सर्वत्र पसरवणाऱ्या महाराजांनी सामाजिक विकास आणि शिक्षण प्रसारासाठी अहोरात्र काम केलं.त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग घेतल्याचंही प्रधानमंत्री म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा