संयुक्त राष्ट्र महासभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करतील संबोधित

नवी दिल्ली, २६ सप्टेंबर २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७५ व्या अधिवेशनाला संबोधित करतील. शनिवारी ते पहिले वक्ते असतील. कोविड -१९ साथीच्या परिस्थितीत या वेळी संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीचे आयोजन केले जात असल्याने ते आभासी पद्धतीनं होत आहे. पंतप्रधानांचे आधीपासूनच नोंदविलेले व्हिडिओ भाषण न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र महासभेच्या कक्षात प्रसारित केले जाईल. अशी अपेक्षा आहे की पंतप्रधान आपल्या भाषणात भारताच्या प्राथमिकता सर्वांसमोर मांडतील.

निरीक्षकांच्या मते दहशतवादाविरूद्धच्या जागतिक कारवाईला बळकटी देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचा भर असेल. भारताकडून मंजूरी समितीमधील उपक्रम आणि व्यक्तींच्या लिस्टिंग आणि डीलिस्टिंग वर अधिक पारदर्शकतेवर जोर देण्यात येईल.

शाश्वत विकास आणि हवामान बदलाशी संबंधित मुद्द्यांवर भारत आपला सक्रिय सहभाग कायम ठेवेल. कोविड -१९ विरुद्धच्या जागतिक सहकार्यासाठी भारत हेल्थकेअर प्रदाता म्हणून असलेल्या भूमिकेस प्रोत्साहन देऊन आपले योगदान अधोरेखित करेल. भारताने दीडशेहून अधिक देशांना आधार दिला आहे.

उल्लेखनीय आहे की सध्या सुरू असलेल्या विविध जागतिक पातळीवर भारत दहशतवाद आणि सीमापार घुसखोरीचा मुद्दा प्रमुखतेने उपस्थित करीत आहे. गुरुवारी सार्क देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत म्हणजेच दक्षिण आशिया प्रादेशिक सहकार संघटनेत भारतानं दहशतवादाला आंतरराष्ट्रीय संबंधांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असल्याचे वर्णन केले होते. एवढेच नव्हे तर मानवाधिकार परिषदेच्या ४५ व्या अधिवेशनाला संबोधित करताना भारताने दहशतवाद मानवतेचा सर्वात मोठे शत्रू असल्याचे वर्णन केले. शुक्रवारी यूएनएचआरसीमधील भारताचे प्रतिनिधी पवन बधे यांनी सांगितले की सध्याच्या लॉकडाऊनचा फायदा दहशतवादी संघटना घेत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा