पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार बंगळुरू टेक समिट २०२० चं उद्घाटन

8

नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बंगळुरू टेक समिट २०२० (बीटीएस २०२०) चं उद्घाटन करतील. या विशेष कार्यक्रमात, नवीन तंत्रज्ञानासह कोरोना नंतर येणाऱ्या प्रमुख आव्हानांवर चर्चा केली जाईल. बेंगळुरू टेक समिट १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली जाईल.

कर्नाटक इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी सोसायटी (केआयटीएस), कर्नाटक सरकारची माहिती तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी आणि स्टार्टअप्स, सॉफ्टवेयर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया (एसटीपीआय) आणि एमएम अ‍ॅक्टिव्ह सायन्स-टेक कम्युनिकेशन्स यांच्याद्वारे या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

या शिखर परिषदेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, स्विस कॉन्फेडरेशनचे उपाध्यक्ष गाय पार्मेलिन आणि इतर अनेक आघाडीचे आंतरराष्ट्रीय दिग्गज उपस्थित असतील. बीटीएस २०२० सेंटरला भेट दिल्यानंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि आयटी मंत्री सी.एन. अश्वथ नारायण म्हणाले की, कार्यक्रमाचे सत्रं १०० टक्के व्हर्च्युअल असल्यानं आम्ही बीटीएस उत्कृष्ट बनविण्यासाठी विस्तृत व्यवस्था केली आहे.

एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की या कार्यक्रमाला २०० हून अधिक भारतीय कंपन्या सहभागी होतील ज्या त्यांच्या स्वत: च्या वर्चुअल प्रदर्शनी, ४००० हून अधिक प्रतिनिधी, २७० स्पीकर्स, सुमारे ७५ पॅनेल चर्चा आणि ५०,००० हून अधिक सहभाग घेणाऱ्यांना सामील करतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा