नवी दिल्ली, २४ सप्टेंबर २०२० : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या फिट इंडिया संवादाअंतर्गत आरोग्य, व्यायाम प्रेमी आणि जनतेशी संवाद साधणार आहेत. फिट इंडिया मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त या संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या संवादादरम्यान, उत्तम आरोग्य राखणारे लोक या वेळी उत्तम आरोग्यासाठी आवश्यक त्या सूचना, अनुभव सांगणार आहेत.
यामध्ये विराट कोहली, मिलिंद सोमणी, ऋतुजा दिवेकर आदींचा समावेश आहे. सध्याच्या कोविड १९ च्या काळात आरोग्य सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्यासाठी व्यायाम, आहार इत्यादीबाबत माहिती देण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मोहीम लोकांची मोहीम असल्याचे म्हटले असून, भारताला एक सुदृढ राष्ट्र बनवण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे. गेल्या वर्षी ही मोहीम सुरू केल्यापासून फ्रीडम रन, सायकलोथोन, फिट इंडिया सप्ताह, फिट इंडिया स्कूल असे विविध मार्गदर्शक उपक्रम राबवण्यात आले आहेत. साडेतीन कोटी लोकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: